चहा सरतो. . गप्पा सरतात




चहा सरतो, गप्पा सरतात,
बैठक सरते.
पण सरतेशेवटी तळाशी. .
थोडीथोडकी चहा नेहमीच उरते.

तसं पाहिलं तर,
गप्पांचंही तसंच असतं,
ग्लास रिता झाला . .
तरी मन रितं नसतं,
दर बैठकीत नेमकं . .
मुद्द्याचं बोलायचं उरतं. .

मग वाटतं. .
दोन कटिंग सांगाव्यात,
आणि सांगावं . .
जे जे सलतंय ते,
पण पुन्हा एकदा. .
चहा सरतो, गप्पा सरतात,
बैठक सरते.

पण सरतेशेवटी तळाशी. .
थोडीथोडकी चहा ही नेहमीच उरते.


-विशाल तळवणेकर

Comments

Popular posts from this blog

Diaries: Via पिल्लू

दावं

ज्याला जे पटेल ते, म्हणजेच. . दहीहंडीसाठी वाट्टेल ते