Posts

हाक

  दर आठवड्याला कोण ना कोण जातंय... कोणाचा मामा, कोणाचे बाबा... कधी एखाद्या जुना मित्र दगावल्याची बातमी पडते ग्रुपवर. RIP. मग हळहळ नुसती. त्यांचे बोल त्यांचा आवाज हसणं असणं सगळं नजरेसमोर ओझरतं. रात्री अपरात्री फोनची रिंग वाजते. असं असं घडलं. समोरची व्यक्ती दबक्या स्वरात सांगते. फोन ठेवण्यापूर्वी जमल्यास ये. असंही सांगते. आता अवेळी आलेला फोन उचलताना किंवा अनपेक्षित मित्राचा फोन घेताना आधीच अवसान गळून पडतं.. गेल्या वर्षभरात बराच राग, दुबळेपणा, हतबलता साचून नासून गेली वर्षभर खुप उथळ, बोगस वरवरची कामं केली वरवरच्या मनानं. फक्त बॉडी जिवंत ठेवली. बाकी संवेदना कधीच ठार झाल्यात. किती जणांकडे जाऊन हाक मारायचं राहिलंय. कोण्याशा डोहात बुडालेला माझ्यातला कलाकार मात्र न चुकता येतो रोज किनाऱ्यावर हाक मारायला. -विशाल तळवणेकर

निखारा

Image
काही  मनं  अकल्पित अशा दुखःचा निखारा जपत असतात, वेळेनुरूप त्यावर राख जमा होते, तोच कोणी नकळत पणे फुंकर मारून जातो वा अशीच एक झुळूक त्यावरून जाते, आणि तो लालेबुंद निखारा उघड्यावर पडतो, बहुतेकांच्या नजरेतून तो निसटतो पण आपल्या नजरेस  ते   येतं, नि क्षणभरासाठी का होईना पण एक चटका बसतो, वाटतं पुढाकार घ्यावा, मनात शिरकाव करून त्यावर पाणी शिंतडावं, पण आपल्याला ते नाही जमत. तो दाह इतका ज्वलंत असतो कि आपल्याला आवरतं घ्यावंच लागतं. . कारण तो निखारा विझवायला एकतर मूळतः राख   झालेलं  अथवा पाण्या प्रमाणे निर्मळ असं मन असावं लागतं. -विशाल तळवणेकर

नुसती कागदावर उतरवली म्हणून. .

Image
कागदावर उतरवली म्हणून काय तिला कविता म्हणायची? एका मागून एक गिरबटलेलं कडवं, कडव्याच्या शेवटी पुन्हा तेच धृवपद येतं आडवं, अस्सल कविता तर आमची आजी विणायची, मंद ताल देणारं तिचं खुटयावरचं बोट, अन जात्याबरोबरच भरडणारे तिचे आडवळणी  ओठ, झाकल्या मुठीने किती छान गुणगुणायचे. . कुणीतरी कागदावर उतरवली म्हणून काय तिला कविता म्हणायची? 'चिऊ' ला यमक 'काऊ' अन 'राम' ला यमक 'श्याम', कविता म्हटलं कि असलंच नुसतं जुळवाजुळविचं काम, काव्य शोधायचं असेल तर त्या कवायतीच्या पटांगणात थांब, चपळ सर्पा प्रमाणे लांब लचक रांग, एका ठेक्यात सावधान दुसरया ठेक्यात विश्राम, कदम ताल करता करता दहिने मूड कर तडख सलाम. बसल्या बैठकीत कागदावर उतरवली म्हणून काय तिला कविता म्हणायची? समोर कागद, पेन आणि मनात घुसमट उरायची, साद ऐकायला कोणी नाही म्हणून भावनांना हि पळवाट करायची, अरे थोडा मॅड होऊन घराच्या भिंतींबाहेर ये, झरयापाशी बसून निसर्गाचं पद्य खोलवर घोटून घे, पाहून ये त्या स्व...

सलाम

रात्रीचे २ वाजलेत, आज झोप नाही लागत, आज नाही वाटत स्वप्नाच्या दुनियेत जाउन फेरफटका मारून यावा असं.            आज नजरेसमोर फक्त तू आहेस. पार्कात बसलेला. एकटाच. शर्टाच्या खिशात एक बॉल-पेन जे वाटत नाही घरी आलेल्या कुरिअर वाल्याला पार्सल मिळाल्याच्या सहीसाठी सोडून इतर कुठे तू वापरत असशील. आणि एक फोनबुक ज्यात नवनवीन नावांची नोंद होणं केव्हाच थांबलं असेल. हातात शेंगदाण्याची पुडी. किती वेळ होऊन गेला, पार्कातल्या सावल्यांची लांबी बदलली पण तुझ्या चेहऱ्यावरचे भाव नाही. ते तसेच, मुर्त! तुझं लक्ष होतं कि नाही काय ठाऊक. पण तुझ्या त्या चण्याची गोडी त्या पाखरांना काही रास नाही. त्यांना हि काहीतरी नवीन हवंय.            तू मला आणि मी तुला अगदी अनोळखी. माझं या पार्कात येणं हि प्रथमच, तू हि पहिल्यांदा आलास कि कोण जाणे पण एकंदरच तुझ्याकडे पाहता दर आठ-एक महिन्यांनी अगदीच झिजल्या म्हणून बदलणाऱ्या चपला खेरीज तुझ्या दिनचर्येत उभ्या आयुष्यात काही बदल घडला असेल असं वाटत नाही. पण एक सांगू? मल...

दावं

Image
स्वैर हे शब्द, स्वैर पण स्तब्ध, अंतरी कल्लोळ, सांगता येईना, जिव्हा हि निशब्द लवणारी पात, राक्षसी जात, सोडता येईना, गर्दीची साथ हवाबंद निवास, मंद हा प्रकाश, पाहता येईना, मृगयेचा सुवास उरीच्या साधना, उरीच्या वासना, सांधता येईना, माझिया मना ठेवितो नाव, बंधिस्त जमाव, चालता येईना, तोडूनी दावं -वि. वि. तळवणेकर

शव-वास

Image
           'पुरुषाने स्वैराचार करावा पण स्त्रीने मात्र पंख गाळून उंबरठ्याशी झुरावं', हे कोणा महापुरुषाचे कथन? सून डॉक्टरीण हवी पण तिने घर सांभाळावं नाहीतर आमच्या घराण्याच्या दिवट्याची चार-चौघात शोभा होते. मुलगी हवी पण का? तर वंशाचा दिवा फुलवणारे यंत्र म्हणून.            मुलाचं प्रेमप्रकरण तरुणाईतील चूकभूल समजून माफ केलं जातं, पण त्याच परिस्थितीत मुलीच्या माथ्यावर अक्षम्य पापाचा ठपका का म्हणून? तिच्या कसोटीत सेकंड इनिंग नसतेच मुळी, पण जर मिळालीच संधी तर तिच्या पदरी येतो तो नेमका 'फोलो-ऑन'!                                                            रात्री चाळीतून शतपावलीस निघा, अथवा काही वेळ बाल्कनीत उभे राहा किंवा सोसायटीच्या गेटपाशी रेंगाळत राहा, हमखास कोणत्या ना कोणत्या खिडकीतून भांडी खणाणण्याचा आवाज येईल. त्या मागोमाग 'पांढऱ्या पायाची'...

स्तब्ध

               अंधुक गर्दी होती. दुपारची वेळ. रविवार. म्हणजे रस्त्यावर एक गोजिरी वर्दळ. पिवळं उन अंगावर घेत शुभ्र कपड्यात  घराबाहेर पडलेली माणसं, काही मागील आठवड्याची दुरुस्त करायची म्हणून तर काही येणाऱ्या आठवड्याची आखणी करायची म्हणून.                त्यात कुठेतरी रित्विक पण होता. आठवड्या भराचं सामान घ्यायला म्हणून. त्या प्रसन्न खेळीमेळीच्या वातावरणात आपलं असं वेगळेपण जपणारा. गालावर हलकीशी दाढी. आयुष्याची राख रांगोळी तो अंगावर एखाद्या दैवी भस्मासारखं परिधान करून वावरत होता. आणि त्या सन्दुक रुपी देहाला टाळं म्हणून डोळ्याला काळा चष्मा.                म्हणजे असा कधी बाजारहाटाला तो निघत नाही म्हणा. पण गेल्या बारा वर्षाचं तप त्याचं, जेव्हा केव्हा जगण्यात "रुटीन" येउन बसेल तेव्हा काहीतरी वेगळं असं करावं म्हणून तो आलेला. तो त्या बाजारातून झपाटल्यागत सपसप पुढे जात होता. एखाद्या भाजीवाल्यासमोर थांबून भाजी एकटक न्याहाळत ह...