Posts

Showing posts from November, 2017

निखारा

Image
काही  मनं  अकल्पित अशा दुखःचा निखारा जपत असतात, वेळेनुरूप त्यावर राख जमा होते, तोच कोणी नकळत पणे फुंकर मारून जातो वा अशीच एक झुळूक त्यावरून जाते, आणि तो लालेबुंद निखारा उघड्यावर पडतो, बहुतेकांच्या नजरेतून तो निसटतो पण आपल्या नजरेस  ते   येतं, नि क्षणभरासाठी का होईना पण एक चटका बसतो, वाटतं पुढाकार घ्यावा, मनात शिरकाव करून त्यावर पाणी शिंतडावं, पण आपल्याला ते नाही जमत. तो दाह इतका ज्वलंत असतो कि आपल्याला आवरतं घ्यावंच लागतं. . कारण तो निखारा विझवायला एकतर मूळतः राख   झालेलं  अथवा पाण्या प्रमाणे निर्मळ असं मन असावं लागतं. -विशाल तळवणेकर

नुसती कागदावर उतरवली म्हणून. .

Image
कागदावर उतरवली म्हणून काय तिला कविता म्हणायची? एका मागून एक गिरबटलेलं कडवं, कडव्याच्या शेवटी पुन्हा तेच धृवपद येतं आडवं, अस्सल कविता तर आमची आजी विणायची, मंद ताल देणारं तिचं खुटयावरचं बोट, अन जात्याबरोबरच भरडणारे तिचे आडवळणी  ओठ, झाकल्या मुठीने किती छान गुणगुणायचे. . कुणीतरी कागदावर उतरवली म्हणून काय तिला कविता म्हणायची? 'चिऊ' ला यमक 'काऊ' अन 'राम' ला यमक 'श्याम', कविता म्हटलं कि असलंच नुसतं जुळवाजुळविचं काम, काव्य शोधायचं असेल तर त्या कवायतीच्या पटांगणात थांब, चपळ सर्पा प्रमाणे लांब लचक रांग, एका ठेक्यात सावधान दुसरया ठेक्यात विश्राम, कदम ताल करता करता दहिने मूड कर तडख सलाम. बसल्या बैठकीत कागदावर उतरवली म्हणून काय तिला कविता म्हणायची? समोर कागद, पेन आणि मनात घुसमट उरायची, साद ऐकायला कोणी नाही म्हणून भावनांना हि पळवाट करायची, अरे थोडा मॅड होऊन घराच्या भिंतींबाहेर ये, झरयापाशी बसून निसर्गाचं पद्य खोलवर घोटून घे, पाहून ये त्या स्व...

सलाम

रात्रीचे २ वाजलेत, आज झोप नाही लागत, आज नाही वाटत स्वप्नाच्या दुनियेत जाउन फेरफटका मारून यावा असं.            आज नजरेसमोर फक्त तू आहेस. पार्कात बसलेला. एकटाच. शर्टाच्या खिशात एक बॉल-पेन जे वाटत नाही घरी आलेल्या कुरिअर वाल्याला पार्सल मिळाल्याच्या सहीसाठी सोडून इतर कुठे तू वापरत असशील. आणि एक फोनबुक ज्यात नवनवीन नावांची नोंद होणं केव्हाच थांबलं असेल. हातात शेंगदाण्याची पुडी. किती वेळ होऊन गेला, पार्कातल्या सावल्यांची लांबी बदलली पण तुझ्या चेहऱ्यावरचे भाव नाही. ते तसेच, मुर्त! तुझं लक्ष होतं कि नाही काय ठाऊक. पण तुझ्या त्या चण्याची गोडी त्या पाखरांना काही रास नाही. त्यांना हि काहीतरी नवीन हवंय.            तू मला आणि मी तुला अगदी अनोळखी. माझं या पार्कात येणं हि प्रथमच, तू हि पहिल्यांदा आलास कि कोण जाणे पण एकंदरच तुझ्याकडे पाहता दर आठ-एक महिन्यांनी अगदीच झिजल्या म्हणून बदलणाऱ्या चपला खेरीज तुझ्या दिनचर्येत उभ्या आयुष्यात काही बदल घडला असेल असं वाटत नाही. पण एक सांगू? मल...

दावं

Image
स्वैर हे शब्द, स्वैर पण स्तब्ध, अंतरी कल्लोळ, सांगता येईना, जिव्हा हि निशब्द लवणारी पात, राक्षसी जात, सोडता येईना, गर्दीची साथ हवाबंद निवास, मंद हा प्रकाश, पाहता येईना, मृगयेचा सुवास उरीच्या साधना, उरीच्या वासना, सांधता येईना, माझिया मना ठेवितो नाव, बंधिस्त जमाव, चालता येईना, तोडूनी दावं -वि. वि. तळवणेकर

शव-वास

Image
           'पुरुषाने स्वैराचार करावा पण स्त्रीने मात्र पंख गाळून उंबरठ्याशी झुरावं', हे कोणा महापुरुषाचे कथन? सून डॉक्टरीण हवी पण तिने घर सांभाळावं नाहीतर आमच्या घराण्याच्या दिवट्याची चार-चौघात शोभा होते. मुलगी हवी पण का? तर वंशाचा दिवा फुलवणारे यंत्र म्हणून.            मुलाचं प्रेमप्रकरण तरुणाईतील चूकभूल समजून माफ केलं जातं, पण त्याच परिस्थितीत मुलीच्या माथ्यावर अक्षम्य पापाचा ठपका का म्हणून? तिच्या कसोटीत सेकंड इनिंग नसतेच मुळी, पण जर मिळालीच संधी तर तिच्या पदरी येतो तो नेमका 'फोलो-ऑन'!                                                            रात्री चाळीतून शतपावलीस निघा, अथवा काही वेळ बाल्कनीत उभे राहा किंवा सोसायटीच्या गेटपाशी रेंगाळत राहा, हमखास कोणत्या ना कोणत्या खिडकीतून भांडी खणाणण्याचा आवाज येईल. त्या मागोमाग 'पांढऱ्या पायाची'...

स्तब्ध

               अंधुक गर्दी होती. दुपारची वेळ. रविवार. म्हणजे रस्त्यावर एक गोजिरी वर्दळ. पिवळं उन अंगावर घेत शुभ्र कपड्यात  घराबाहेर पडलेली माणसं, काही मागील आठवड्याची दुरुस्त करायची म्हणून तर काही येणाऱ्या आठवड्याची आखणी करायची म्हणून.                त्यात कुठेतरी रित्विक पण होता. आठवड्या भराचं सामान घ्यायला म्हणून. त्या प्रसन्न खेळीमेळीच्या वातावरणात आपलं असं वेगळेपण जपणारा. गालावर हलकीशी दाढी. आयुष्याची राख रांगोळी तो अंगावर एखाद्या दैवी भस्मासारखं परिधान करून वावरत होता. आणि त्या सन्दुक रुपी देहाला टाळं म्हणून डोळ्याला काळा चष्मा.                म्हणजे असा कधी बाजारहाटाला तो निघत नाही म्हणा. पण गेल्या बारा वर्षाचं तप त्याचं, जेव्हा केव्हा जगण्यात "रुटीन" येउन बसेल तेव्हा काहीतरी वेगळं असं करावं म्हणून तो आलेला. तो त्या बाजारातून झपाटल्यागत सपसप पुढे जात होता. एखाद्या भाजीवाल्यासमोर थांबून भाजी एकटक न्याहाळत ह...

येतो

"ते काय आहे?", ताईने पुस्तकातून डोकं बाहेर काढत विचारलं. "I am quitting." अनय हात उडवत म्हणाला. "okay?" तिने त्याच्याकडे सबबीप्रित्यर्थ कटाक्ष टाकला. त्याने खांदे झटकले. ताईने पुस्तक बाजूला ठेवलं व उठून सरळ बसली. खिडकीतून रस्त्यावरचा गोंगाट आत येत होता. त्याला तो गोंगाट सहन होईना. त्याने खिडकी बंद केली. ताई स्तब्ध बसून होती. खोलीत फक्त पंख्याच्या वाऱ्याने पुस्तकाची पाने मागे मागे जात होती. "हं! तू quit करतोयस, आणि??" ताईने बसल्या जागी विचारलं. "आणि काय. . एक महिन्याच्या नोटीस वर आहे." अनय सरळ आतल्या खोलीत शिरला. "ते नोटीस केलं रे. . मूळ मुद्दा सांग." ताई चढ्या आवाजात म्हणाली. "मुद्दा वगैरे काही नाही. करिअर जम्प घेतोय." त्याने आतूनच आणखी एक लेटर समोर केलं. ऑफर लेटर होतं ते. कोणा एका दूर गावच्या कंपनीचं. "काय आहे हे म्हणालास?" "जम्प! पॅकेज मध्ये पण आणि पोस्ट मध्ये पण!" ती ताडकन उठली नि आतल्या खोलीत शिरली व त्याला कोपराने हिसकावून समोर उभं केलं. "जम्प??" तिने तिडीकीने विचारलं...

येतोय मी

Image
फोटो - आशिष तावडे  अरे मी काय  म्हणतो, मित्रा ... ए ... शुक शुक . . ए दादा.. मी काय म्हणतोय, हा बोल ना भावा. हा . . तर मी म्हणतोय . . बाप्पा ला बाप्पाच राहू द्या कि, अरे काय म्हणतो तू ? राजा आहे हा आपला राजा!!! यंदा हि स्पर्धेचा जॅक लावलाय, आपणच जिंकणार!!! गॅरंटी देतो मी! हा... हाच मुद्दा आहे माझा बघ ते बघ ना ते कधीचे ताटकळत राहिलेत, त्यांना एकदा बाप्पाला मनोभावे पाहू द्यात. .. . भावा उद्या विसर्जनाचा दिवस आहे लायनीला गर्दी तर असणारच. तरी पण बघ ना रे. अच्छा तुझे खास आहेत का ?? थांब. . बघतो मी, ए परश्या!!! त्या उंदराच्या टोपीवाल्याला काकांना सोड रे आत! हा!!!! तर सांगतो काय तुला, आपल्या शब्दावर सगळं होतं इथे, गॅरंटी देतो मी! अरे म्हणजे तसं नाही रे म्हणजे हे कसले काय गेट नि हा कसला काय पास? कसली हि श्रद्धेपोटी तारण ठेवलेली भेटींची आरास? अरे तसं नसतं रे. . तू ना फक्त अंगाने सुटलायस पण अकलेने लहान आहेस तू . . मघाशी आत गेलेलास ना तू? पाया पडलास ना? दानपेटीत पैसे टाकलेस ना? आता परत एकदा जा आत जा आणि आता आपल्या राजाकडे थोडी अक्कल माग. म्हणजे तस...

चहा सरतो. . गप्पा सरतात

Image
चहा सरतो, गप्पा सरतात, बैठक सरते. पण सरतेशेवटी तळाशी. . थोडीथोडकी चहा नेहमीच उरते. तसं पाहिलं तर, गप्पांचंही तसंच असतं, ग्लास रिता झाला . . तरी मन रितं नसतं, दर बैठकीत नेमकं . . मुद्द्याचं बोलायचं उरतं. . मग वाटतं. . दोन कटिंग सांगाव्यात, आणि सांगावं . . जे जे सलतंय ते, पण पुन्हा एकदा. . चहा सरतो, गप्पा सरतात, बैठक सरते. पण सरतेशेवटी तळाशी. . थोडीथोडकी चहा ही नेहमीच उरते. -विशाल तळवणेकर

अडचण

Image
'किती अडचण होत होती ना माझी?' तो नजर रोखून म्हणतो. 'अडचण? कायतरीच काय?' ती हि अजाणतेपणाचा आव आणत उत्तरते. 'हो अडचणच!'  त्याच्या आवाजात करडेपण कायम होतं, तो तिला अगदी धारेवर धरून उद्देशत होता. 'पसारा तो कोणे एके काळी होता. आता ती अडचणच आहे नाही?' ती पळवाट शोधत असते, पण त्या अरुंद बाल्कनीतून कुठेच मार्ग सुचत नाही. 'वेड लागलंय तुला.' ती काहीसं दुखऱ्या मनाने म्हणते. तो हसतो. अगदी प्रायवेटली! 'वेडाचं काय घेऊन बसलीयस.' तो तिला पाठ करून तिथेच बाल्कनीत उभा राहतो. आणि आकाशातला चंद्र पाहून पुन्हा हसतो. 'हाह! विरोधाभास!' तो मनातल्या मनात म्हणतो. पण त्याच्या डोळ्यातलं चंद्राचं ते तरल चित्रण ते क्षणिकच. एकीकडे त्याचा तो कडवा स्वर नि दुसरीकडे तिचं पिळवटलेलं मन. पण आज त्याला कशाचीच तमा नाही. 'तूच बघ ना... पसारा… पसारा हा आवरता येतो..' '...आणि अडचण?' ती त्याच्या बोलण्याचा वेध घेत त्याला मध्येच तोडून विचारते.  तो अर्धवट वळतो. 'अडचण? अडचण हि दूरच सारावी लागते!' खट्ट!!! निरव शांतता. किती तरी ...

हि सकाळ

Image
सुख म्हणजे? एक रम्य सकाळ. . . अशी सकाळ, जिथे सकाळचा गजर व्हावा पण त्याला हि एका मधूर बासरीची तान असावी. . किलकिल्या अर्धवट उघड्या डोळ्यातून सर्व काही शुभ्र असं वाटावं. . बेडरूमच्या खिडकीतून वारयासोबत पडद्याशी लडिवाळ खेळ करत आत येणारी पिवळसर गोजिरी किरणं . . . आह!! आणि त्या मागोमाग तू! भरजरी शालू नेसून एखाद्या मखमली मोरपिसाप्रमाणे अलगद पावलांनी यावं . . इतकं अलगद कि तुझ्या शीतल स्पर्शाने फरशीलाही गुदगुल्या व्हाव्यात. . तुझ्या पुढे तुरुतुरु चालणारी झुळूक तुझा सुगंध लेवून घरभर बागडावी, लग्नानंतर नवीनच घरात आलेली तू, तुझ्या चुडयाच्या कणकण आवाजाने घर मंत्रमुग्ध करून सोडवंस . . . . तू, तुझा गंध, तुझी मी कामाला जावं म्हणून चाललेली चळवळ, तुझं असणं, आणि या सगळ्याने रेंगाळलेला मी. . . लग्नासाठी काढलेली सुट्टी संपलीय, आज पासून कामावर रुजू. हि सकाळ, इतरांना हेवा वाटेल इतकी सुंदर! इतकी रम्य! म्हणजे काय सांगू आज हा क्षण मी कसा कसा मिरवणारेय ते… खासच सर्व. . .  हि सकाळ, हा क्षण, हा मी, हि तू, हे सुख, हे सर्व. . . . . अगदी जिवलग . . . अगदी तुझ्यासारखं.  ...

Diaries: Via पिल्लू

दि. - ०३.१२.१२ आज खूपच उशीर झालाय डायरी लिहायला, खरं पाहावं तर उद्याचा दिवस सुरु झालाय. एकीकडे रितू रुसून फुगून शेवटी खिडकीकडे तोंड करून निजलीय, पिल्लू त्याच्या मित्रपरिवारात नव्याने सामील झालेल्या सुपरमनशी गोड मिठी मारून निवांत झोपी गेलंय. बेड लगतच्या टेबलवरील घड्याळ जरी एखाद्या आळसावलेल्या माणसाप्रमाणे दोन्ही हात ताणून जांभया देत रात्रीचे १.५० झालेत म्हणून सांगतंय तरीही इतक्या वर्षांचा रुटिन तो कसा मोडायचा. म्हणून आजही बसलोच. (थोडासा पसारा हि आहे डोक्यात तो आवरूया म्हणतो) असो! आज शेवटी उशीर व्हायचा तो झालाच. कसाबसा घरी परतलो. काही मंडळी गेट वरच भेटली. दारात रितू भयंकर चिडली होती, तिने नजरेनेच सिंहगर्जना केली. मी पिल्लू कडे पाहिलं, ते फार दमलेलं पण मला पाहून पळत पळत जवळ आलं. मी त्याच्या गालाचा मुका घ्यायला खाली वाकलो तर त्याने माझ्या हातातला सुपरमन हिसकावून घेतला व त्याला घेऊन घरभर बागडत होता. मला त्या क्षणी अगदी ओकबोकं वाटत होतं. ते म्हणतात ना  guilty conscious  तसं वाटत होतं. रितू लालेबुंद डोळ्यांनी आग...

ठराव

पक्ष्यांचा किलबिलाट केव्हाचाच क्षीण होऊन गेला होता. ती केव्हाची येउन पारापाशी गिरक्या घेत उभी होती. सारखी सारखी मान उंचावून पाहतेय, दूर वर कोणाची चाहूल लागतेय का ते. पण कोणी नाही. 'आपलं ठरलं होतं, सकाळच्या प्रहराला भेटायचं. . . हुह्ह !' ती स्वतःशीच पुटपुटत झाडाची पानं कुस्करून जमिनीवर भिरकावते, व पुन्हा गावाकडे पाहते. शेवटी घिरट्या घालून घालून दमून खिन्न मनाने पारावर जाउन बसते. आता फक्त रडू फुटायचं राहिलं होतं तेवढंच. तोच कोणीतरी धापा टाकत येत असल्याचा आवाज येतो. ती आयुष्यभराच्या अपेक्षांचं ओझं घेऊन वळते. पण त्याला रिकामी हाती येताना पाहून अधिकच खिन्न होते. तो तिच्या समोर येउन उभा राहतो. तिची संपूर्ण काया नजर भरून पाहत राहतो, मग क्षणभर तिचा चेहरा न्याहाळतो. आणि माहित असूनही उगाचच विचारतो, 'काय झालं?' ती हिरमुसून म्हणते, 'काही नाही.' तो चटकन परत प्रश्न करतो, 'काही उत्तर नाही मिळालं ना?' ती हलकंसं वर पाहते पण काही बोलत नाही. तो तिला खांद्याला धरून खाली बसवत म्हणतो,  'अगं प्...

सुखाचं चिटोरं

Image
                  दर दुसर्या व चौथ्या शनिवारी कॉलनीच्या थेटरात (पत्र्याच्या शेडमध्ये) कॉलनीचा हास्य कट्टा भरतो. सोसायटीच्या अनेक उपक्रमातील एक. मी सहसा असल्या कार्यक्रमांना भिक घालत नाही पण आजकाल सगळेच एकदम बिझी मोड वर चालतात, तर अधून मधून जाउन बसतो शेवटच्या बाकावर. साठे साहेब या कट्ट्याचे जनक. ते आपल्या हलक्या-फुलक्या चुटकुल्यांची सांगड घालत मंच सांभाळतात. चांगली २०-२५ हौशी मंडळी जातीने जमतात व सोबतच काही बुजुर्ग मंडळी कॉलनीत आडोश्याला झाड नाही म्हणून या शेड मध्ये येउन बसतात. लहान्यांची ये-जा, पकड-पकडी चालूच असते.  घड्याळाने ६ चा टोला दिला कि साठे साहेब कट्ट्याला सुरवात करतात. दाराकडे मीच बसलेलो म्हणून मला खुणेनेच सांगितला दार बंद करा म्हणून. मी आपलं पायानेच पुढे सारलं आणि टेकून बसलो बाकावर.                   कट्ट्यावर खूप नमुने मंडळी जमतात आपापले किस्से सांगायला. प्रत्येकाने आपला किस्सा कागदावर लिहून साठ्यांकडे द्यायचा ते त्यातला सर्वात हास्यास्प...

ज्याला जे पटेल ते, म्हणजेच. . दहीहंडीसाठी वाट्टेल ते

Image
हा ब्लॉग लिहिण्यामागे समीक्षण वगैरे असला, किंवा उगीचच सिद्धेश आपला मित्र म्हणून उसनी तारीफ करा यातला कोणताही हेतू नव्हता पण ते असतं ना… थरात कोणीतरी बेंबीच्या देठापासून आवाज देतो,  "अरे. .  बोल बजरंग…"  आणि आपल्या तोंडून आपसूकच निघतं  ". . . . बली कि जय!!!"  असंच काहीसं हे, म्हणजे मला जे पटलं ते.                       अनुबंध २०१३  या कार्यक्रमात  साद एन्टरटेनमेंट प्रस्तुत सिद्धेश सावंत दिग्दर्शित "दहीहंडीसाठी वाट्टेल ते"  हा  स्मिता पाटील लघुपट स्पर्धेत  घवघवीत यश (सर्वोत्कृष्ट लघुपट आणि एडिटिंग - प्रथम, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - द्वितीय क्रमांक) संपादन केलेला माहितीपट प्रसारित करण्यात येणार होता, साडेसात वाजता रवींद्र नाटयमंदिरला. साडेपाच पर्यंत घरीच होतो. आलं मनात, सरळ प्रभादेवी गाठलं, रवींद्र नात्य मंदिर. डोक्युमेंट्री सुरु झाली, आणि त्यात दर्शवलेला विरोधाभास, याबरोबर प्रेक्षकांचा हशा, आणि थराराबरोबर हायसे होणारे कित्येक श्वास इथेच ह...

धागे-दोरे

Image
             रॉनीने वाईन शॉप समोरच्या सिग्नलला गाडी उभी केली. सिद्धार्थने फक्त 'रोज का ना? ' एवढंच विचारलं नि दार उघडून निघाला. पाठून रॉनी काहीच बोलला नाही म्हणजे 'हो!' हे त्याला काही वेगळं सांगायला नको होतं.              रॉनी समोर ये-जा करणाऱ्या गाड्या पाहण्यात गुंग होतं. तेवढ्यात खिडकीवर एक चिमुरडा येऊन थबकला. 'साब, खिलोना ले लो! साब!' 'पच्चीस का एक है साब'! त्याला पाहून रॉनीने नकारार्थी मान हलवली. तरी त्याची 'साब लेलो ना, ले लो ना' ची सरबत्ती चालूच होती. रॉनी तुसडेपणाने हात भिरकावत खेकसला 'जा ना मेरे बाप. .' आणि म्हणता  म्हणता मध्येच थांबला. कशाने तरी त्याचं लक्ष वेधून घेतलं. तो स्वतःशी थोडासा हसला आणि पोराच्या खेळण्याचा झोळीकडे बोट  दाखवत म्हणाला, 'वो गुडिया देना. कितने की है?'               'पच्चीस रुपये. इम्पोटेड है साब.' पोर म्हणालं.                'हं..' करत रॉनीने dashboard...

गर्व नाही, माज आहे मला म्हणून सांगतोय !!

Image
       काही वर्षांपूर्वीची गोष्ट हि.       मी 6वी 7वीत असेन. हम्म! 7वीतच.  कॉलनी मध्ये नवीन नवीन फुटबॉल खेळायला सुरवात झालेली, सर्व मोठ्या मुलांनी पैसे गोळा करून बॉल विकत आणला. मग दररोज संध्याकाळी टाकीवर (आमच्यासाठी ते मैदान होतं, चांगली सव्वाशे मीटर लांब सिमेंट ची टाकी) जमायचं. मग एक-एक करून सगळे महत्वाची अशी (वट वाली) पोरं जमली कि त्यातला सर्वात सिनियर संघ निवडायचा.         खरतर टीम अशी नव्हतीच, ज्याचं ज्याचाशी चांगलं जुळायचं तो एका बाजूला बाकी सर्व लिंबू टिंबू दुसरया साईडला.  मी लहान होतो, पण नाक्यावर पोरांत उठणं-बसणं असायचं म्हणून मला नेहमी चांगल्या टीम मध्ये खेळायला मिळायचं. कच्चा लिंबू म्हणून का होईना, पण मी नेहमी त्याच टीम मध्ये खेळायचो. ते मला 'बॉल आला कि गोलमध्ये ढकल कसातरी, फाउल करू नको फक्त' अशी ताकीद देऊन समोरच्या टीमच्या गोलपोस्ट च्या शेजारी उभे करायचे 'शो-पीस' म्हणून.  पण त्यातही मी फार खुशीत होतो (नेहमी जिंकणाऱ्या संघामध्ये उभं राहायला कोणाला नाही आवडत??).      ...

कलासक्ती

      नाटक पाहून घरी परतत होतो, बस ची वाट बघून बघून कंटाळून मग रिक्षा थांबवली. "NNP चलोगे??"         रिक्षावाल्याने meter down केला. रिक्षामध्ये बसल्यावर मस्त तंद्री लागते, मला फार आवडतं असं एकटंच बसून रस्त्यावर होणाऱ्या घडामोडी पाहायला. . .  असो. तर मी असाच बाहेर डोळे लावून बसलेलो आणि तितक्यात कोणीतरी कुकर चं झाकण नीट लावलं नाही कि जसा आवाज येतो तसा काहीसा आवाज येऊ लागला; पाहतो तर रिक्षावाला तोंडाने हवा मारत होता. मला हसू आलं पण मी ते आवरलं. त्याने वाटतं आरश्यातून मला हसताना हेरलं, त्याने स्पष्टीकरण दिलं- "साहब, सिटी बजाना सिख रहा हु, सुबह से कोशिश कर रहा हु, पर ससुरी बजती हि नही..!!!"         मी अगदी मोकळेपणाने बोललो, 'उसमे कौनसी बडी बात है' " नहीं, वैसे नहीं पर कुछ हुनर तो होना चाहिए न?? दिन भर में करने के लिए "         मग मी त्याला रीतसर अगदी सर्वात साधी सोप्पी [ जी मला जमते ती ;) ] शिटी शिकवायला लागलो. म्हणजे ओठांचा 'O' सारखा आकार करून, 'फिर जुबान थोडी नीची रखो और सांस बाहर छोडो' असा काहीस...

आत्ये

                  उद्या भाऊबीज, लोकल ट्रेन ला गर्दी असेल म्हणून बाबांनी आजच बहिणीकडे जाऊन यायचं असं ठरवलं. कधी नव्हे ती आई सुद्धा तयार झाली, मला मात्र औपचारिकता म्हणून विचारलं,"येतो काय रे?? मशीद बंदरच्या आते कडे..." आणि नेहमीप्रमाणे माझं 'Schedule' तसं tight  होतं, पण मीही आपसूकच म्हणालो, "हो!!!"                   लिला आत्ये, मशीद बंदरला राहायला. मी सहावी सातवी ला असताना घरी यायची, आणि ती घरी असली कि घरात काटेकोर शिस्त पाळली जायची. सर्व मित्र मंडळींना घरी येण्यास मज्जाव असायचा आणि निव्वळ या एका कारणास्तव मला लिला आत्येचा फार राग यायचा... कारण मला वाटतं, जरी प्रेम आंधळं असलं तरी शालेय जीवनात मात्र, "Friendship  is  Blind...!!!" पण दम्याच्या त्रासाने हळूहळू आत्येची तब्ब्येत खालावत गेली आणि त्याच बरोबर त्यांचं घरी येणं हि कमी झालं.                                    ...