देवमाणूसच तो....
कितीही अग्निदिव्य पार केलीत,
तरी त्याच्या कर्तृत्वासमोर आपल्या खुजेपणाची जाणीव तो करून देतो;
कितीही साधेपणाचा आव आणलात
तरी साधुत्वाचा महामेरुच तो!!,
त्याचं काय आहे ना मित्रहो,
आपण कसेही असलो, आपण कोणीही असलो,
....तरी देवमाणूसच तो!!!
स्वप्नं तर सगळेच पाहतात,
मोठमोठाल्या घरात तर कित्येक जण राहतात,
पण मला सांगा मित्रहो,
इतरांच्या स्वप्नात कितीजण घर करून जातात??
इतरांच्या स्वप्नात कितीजण घर करून जातात??
त्याचं काय आहे ना मित्रहो,
आपण कसेही असलो, आपण कोणीही असलो,
....तरी देवमाणूसच तो!!!
जग तर धावतं आहे,
आपणही सोबत धावतोय,
पण धावांच्या शिखरावर जाऊनही,
आपल्या प्रत्येक पावलावर करोडोंचा श्वास रोखणारा तो,
कसं जमतं तरी कसं त्याला???
कारण एकच आहे मित्रांनो,
आपण कसेही असलो, आपण कोणीही असलो,
....तरी देवमाणूसच तो!!!
-वि. वि. तळवणेकर

Comments
Post a Comment