खंत


साल-दर साल प्रमाणे लावून बसलाय आकाशाला डोळा,
अन फुलवू पाहतोय असंख्य अपेक्षांचा मळा,

वरून दडून पाहतोय 'तो' त्याची मजा,
आणि नेहमीप्रमाणेच राब राब राबतोय हा बळीराजा,

क्षणो क्षणी लाखो चिंता घेत असतात वादळी उसंत,
पण का कुणास ठाऊक आजही भरून आलाय उर.....
.....पण तसेच कोरे आहे आसमंत..!!

निसर्गावर काही रोष नाही,
पण मनाला मात्र निव्वळ इतकीच एक खंत...

.....इतकीच एक खंत

-विशाल तळवणेकर 

Comments

Popular posts from this blog

Diaries: Via पिल्लू

ज्याला जे पटेल ते, म्हणजेच. . दहीहंडीसाठी वाट्टेल ते

निखारा